बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व सलामीवीर फलंदाज तमीम इक्बाल याला हृदयविकाराचा झटका आला आहे. खरंतर, सामना खेळत असताना तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमीम इक्बाल ढाका प्रीमियर लीगमध्ये मोहम्मद स्पोर्टिंग क्लबकडून खेळत होता. तमीम इक्बालने क्षेत्ररक्षण करताना छातीत दुखत असल्याची तक्रार केली. आज ढाका प्रीमियर लीगमध्ये मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब हे संघ आमनेसामने होते. यादरम्यान तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका आला.
तमीम इक्बालला फिल्डिंग करताना अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर त्याला फजिलातुनेशा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, तमीम इक्बालचा वैद्यकीय अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) डॉक्टर देबाशिष चौधरी यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. खरंतर, तमीम इक्बालने छातीत दुखण्याची तक्रार करताच, त्याला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. क्रिकेट वेबसाइट क्रिकइन्फोनुसार, तमीम इक्बालने 50 षटकांच्या सामन्याच्या पहिल्या डावात याची तक्रार केली होती, त्यानंतर वैद्यकीय तज्ञ ताबडतोब पोहोचले.