चिपळुण ; जमीन खरेदीत १५ लाखांची फसवणूक; सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल

0
238
बातम्या शेअर करा

चिपळूण – जमीन खरेदीपोटी १४ लाख ८२ हजार ३०० रुपयांची रक्कम घेऊन सदरची जमीन संबंधिताच्या नावे न करता फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी मौजे चिंचघरी येथे उघड झाला आहे. संबंधित व्यक्तीने पैसे परत मागितल्यानंतर त्याला धमकीही देण्यात आली. याप्रकरणी येथील पोलिस स्थानकात पंकज खेडेकर , प्रीतम खेडेकर या दोन सख्ख्या भावांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद विजय वसंत पाथरवट यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २० सप्टेंबर २०२२ ते आतापर्यंतच्या कालावधीत पंकज रजनीकांत खेडेकर यांना जमीन गट नंबर ४५१ व ग्रामपंचायत घर नंबर ६४० ही मिळकत खरेदी घेण्यासाठी एकूण १४ लाख ८२ हजार ३०० रुपये इतकी रक्कम त्यांना रोख, चेक व फोन-पेद्वारे दिली होती. या व्यवहाराबाबत पंकज खेडेकर याचा भाऊ प्रीतम खेडेकर याला माहिती होती. या व्यवहाराबाबतचे करारपत्रही पंकज खेडेकर यांनी केले आहे; परंतु ठरल्याप्रमाणे पंकज खेडेकर याने पुढे कोणताही बाब पूर्ण केली नाही.

याबाबत विचारण केली असता, तसेच जमीन नावावर करणार नसाल, तर आमचे पैसे परत करा, असे सांगितले असताना पंकज खेडेकर व प्रीतम खेडेकर या दोघांनीही पाथरवट यांना धमकी दिली. त्यानुसार या दोघांवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४), ३ (५) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here