मृदूंगमणी शीरचे सुपुत्र दिलीप गोरीवले नमन कलेत अग्रेशील ..!!

0
275
बातम्या शेअर करा

गुहागर – (अनंत मोरे) – कोकण म्हणजे अनेक लोककलांच नंदनवन समजले जाते सर्वाधिक लोकप्रिय लोककला म्हणजे नमन…मृदूंगावर थाप पडली की कोकणी अर्थात नमन प्रेमी माणसांचे हात पाय आपोआप थिरकायला लागतात. त्या मृदूंगाचा आवाज कानी आला की जणू एक वेगळीच ऊर्जा अंगात संचारते..अशाच मृदूंगाच्या ठेक्यावर सर्वांनाच थिरकायला लावणारा आपली ही परंपरा जपण्या साठी नेहमीच प्रयत्नशील असणारे शीर गावातील तरूण दिलीप गोरिवले एक उत्तम मृदूंग वादक या तरूणांनी पूर्वजानी जे जपलं आहे ते ह्या पिढीपर्यंत आणू लोककला अविरतपणे जोपासण्याचे काम करत आहे.

लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरपलं असता मोठ्या जिद्धीने दोन भावांसमवेत परिवार सांभाळला अर्थातच त्यांचा सहपरिवार मो्ठा असल्याने आणि त्यांचा स्वभाव हा मितभाषी आणि प्रेमळ असल्यामुळे साऱ्यांची साथ लाभली. परंतु घरच्या परिस्थितीमुळे उंच शिक्षणाचा पल्ला फार मोठा गाठता आला नाही. परंतु ग्रामीण भागात राहून नवनवीन कला शिकण हे जणू त्यांच्या रक्तातच, शेतीची अवजारे बनवणे, गुरांवर पूर्वी होणाऱ्या गावठी उपचारासाठी ते नेहमीच अग्रेसर असत, एक उत्तम ड्रायव्हर सुद्धा आहेत. पुढे गवंडी काम शिकून स्वतः गावातील घरे बांधण्याचे काम करत असून ते उत्तम कारागीर म्हणून ओळख बनवली त्यानंतर ते बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहेत. वेळप्रसंगी हाकेला धावून जात आहे. गावच्या चाळीरिती,लोकपरंपरा, गाव खेळे हे सारं जपण्यात त्यांचा मोठा सहभाग असतो. सद्या शीर गावच्या खेळ्यानमध्ये मृदूंगाच्या ठेक्यावर थिरकायला लावावा असा अप्रतिम मृदूंग ते वाजवतात.. ही कला ते कोणतं शिक्षण घेऊन नाही तर अंगीकृत असलेल्या कलागुणांमधूनच शिकेल अर्थात त्यांना ती दैवी देणगी असावी. मृदूंग वाजवताना तो तितक्याच सहजतेने नाचवतात हा देखावा पाहण्यासारखा असतो. सद्या बदलत्या युगानुसार नवनवीन वाद्य तसेच ते वाजवण्याच्या पद्धती देखील बदलल्या आहेत.
गाव ओसाड पडत असल्यामुळे हे सारं आता काही ठिकाणी लोप पावताना दिसते.परंतु अशा काही लोककलावंतामुळं हे पारंपारिक वैभव अजून टिकून आहे.दिवसभर मेहनतीच कामं करूनही रात्री मृदूंग वाजवताना त्यांच्याकडे पाहून नमन लोककलेचा जणू हा राजा असा भास होतो. दिवसभर असणाऱ्या धावपळीचा कामाचा किंचितही त्राण रात्री त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. सारा थकवा दूर सारून आनंदाने हे खेळे नाचतात आणि पुन्हां एकदा नेहमीप्रमाणे आपल्या कामावर रुजू होतात.कोणताही मोबदला नसताना केवळ आपल्या गावासाठी तथा देवासाठी हे सारं निःस्वार्थपणे करणं म्हणजे अनन्य साधारण आहें आणि ते फक्त कोकणातील लोककलावंतानाच जमू शकतं. त्यातीलच एक शीर गावच्या पारंपारिक लोककलेतील हिरा. तो म्हणजे दिलीप गोरिवले आहेत. असेच प्रत्येक गावोगावीचे असे हिरे अनेक वर्ष पडद्या आडच राहिले आहेत. नमन कलेवर अतोनात प्रेम करणारे दिलीप गोरिवले हे पारंपरिक नमन गावगाडा यामध्ये आपलं योगदान शीर गावात यापुढे त्याचे कायम स्मरणीय राहिल.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here