चिपळूण ; जुगार, मटका धंदे याची माहिती द्या आणि पाच हजार रुपये घेऊन जा…. शहरात अनोखा बॅनर…

0
158
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण शहरातील अनेक भागात जुगार आणि मटका धंदे असून त्यांचे समूळ नष्ट करण्यासाठी चिपळूण मध्ये युवक काँग्रेसने अनोखे अभियान सुरू केले आहे. या अभियानात सहभागी होऊन एखाद्या व्यक्तीने जर लाईव्ह लोकेशन दिले तर त्याला 5000 हजार रुपये बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र हे बॅनर अभियान चर्चेचा विषय बनले

अनेक नव तरुण युवक हे मटका आणि जुगाराच्या नादी लागून लागून उध्वस्त झाले आहेत.या तरुणांना उद्धवस्त करणाऱ्या जुगार मटक्याची माहिती देणाऱ्यांसाठी चिपळूण युवक काँग्रेसकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या मध्ये या व्यवसाय संबंधित Live लोकेशन्स सहित माहिती पुरवणाऱ्यांना 5 हजार रुपये रोख इनाम देण्यात येणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष साजिद सरगुरो यांच्याकडून चिपळूण शहरात बॅनरबाजी करून देण्यात आले आहे.

सध्या शहरातील वाढते अवैध जुगार मटका व्यवसायाकडे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसची नामी शक्कल लढवली असती आता पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here