गुहागर ; 8 मार्च रोजी गिमवी श्री झोलाई देवीचा समा उत्सव (जत्रा)

0
182
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील गिमवी येथील ग्रामदेवता श्री झोलाई देवी मंदिराचा समा उत्सव (जत्रा) शनिवारी 8 मार्च रोजी पार पडणार आहे.

गुहागर तालुक्यातील गिमवी येथे 8 मार्च रोजी दुपारी पारंपारिक पद्धतीने पूर्वीच्या प्रथेनुसार हा समा उत्सव (जत्रा) पार पडला जाणार आहे. यामध्ये दरवर्षीप्रमाणे लाट फिरण्याचा कार्यक्रम देखील होईल. तसेच रात्री ठीक दहा वाजता TWJ यांच्या सौजन्याने पुरस्कृत सामाजिक कौटुंबिक हृदयाला रडू लावणारे तीन अंकी नाटक जन्मदाता सादर केले जाणार आहे.
या जन्मदाता नाटकांमध्ये गावातीलच स्थानिक कलाकार असून गेली अनेक वर्ष ते रंगभूमीवर काम करणारे कलाकार आहेत. तरी सर्व ग्रामस्थांनी या जत्रेला यावे तसेच जन्मदाता हे नाटक पहावे असे आव्हान झोलाई देवी देवस्थान ग्रामस्थ मित्र मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here