वाई – वाई औद्योगिक वसाहतीमध्ये गरवारे कंपनीजवळ शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये लाईटच्या पोल शेजारील पालापाचोळा आणि लहान झाडांनी पेट घेतला.
आज दुपारी दीडच्या सुमारास जोरदार वारा सुटला आणि त्यातच गरवारे फायबर टेक्निकलं कंपनीच्या शेजारील खांबावर शॉर्ट सर्किट झाले. त्याच्या ठिणग्या खाली पडल्याने सुका पालापाचोळा आणि छोट्या झाडा-झुडपांनी पेट घेतला. धुराचा लोट दिसल्यानंतर गरवारे कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. गरवारे कंपनीचे अधिकारी महेंद्र धनवे यांनी तातडीने गरवारे आणि वाई नगरपालिकेच्या अग्नीशामक बंबाला बोलावून त्यांच्या आणि गरवारे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यादरम्यान महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा बंद केला होता. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. गरवारे कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवल्याने पुढील अनर्थ टळला असुन त्यांचे कौतुक होत आहे.