शृंगारतळी – गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. प्रथम वर्ष वाणिज्य वर्गातील साक्षी पवार हीने कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडा सादर केला. तिला महाविद्यालयाचा जी. एस. राज धोपट याने ढोलकी वाजवून साथ दिली. यावेळी सर्वच वातावरण चेतनामय व स्पुर्तीदायक झाले होते. उपस्थित विद्यार्थ्यांनी ‘स्वराज संस्थापक कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हरहर महादेव’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देवून जयघोष केला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामाजिक व राजकीय जीवन कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. आणि उपस्थित प्राध्यापकवृंद व विद्यार्थी यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, प्रा. सौम्या चौघुले, प्रा. कांचन कदम, डॉ. सुभाष खोत, प्रा. लंकेश गजभिये, डॉ. दिनेश पारखे, प्रा. सुभाष घडशी, महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक सुधीर टानकर, कनिष्ठ लिपिक विश्वनाथ कदम, ग्रंथालय परिचर परशुराम चव्हाण, रवींद्र चव्हाण, महेश झगडे व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष वाणिज्य वर्गातील समृद्धी घाणेकर हीने केले तर उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे आभार प्रा. कांचन कदम यांनी मानले.