सातारा ; चेष्टामस्करीतून सुरु झाला वाद अन्…

0
1112
बातम्या शेअर करा

वाई – -सातारा जिल्ह्यातील वाई येथील सोनगीरवाडी येथे दारू पीत मस्करी करत असतानाच झालेल्या वादावादी तून एकाला अमानुषपणे मारहाण करत खून केल्याची घटना घडली याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात वाई पोलिसांना यश आले असून या प्रकाराने वाई परिसरात खळबळ माजली आहे.

वाई शहरांतील सोनगिरीवाडी येथील बाभळवनात राज अरुणकुमार सिंग, आणि त्याचे मित्र प्रणित गायकवाड, शाकीर खान, विनोद साळुंखे व हर्षवर्धन कारेकर हे दारू पिण्यासाठी बसले होते. याचवेळी शाकीर राज, व प्रणित यांच्यात चेष्टामस्करीतून वाद सुरु झाला. हा वाद विकोपाला गेला आणि त्यातच रागाच्या भरात प्रणित याने राज याच्या डोक्यात बिअरच्या दोन बॉटल फोडल्या तसेच शाकीर व प्रणित यांनी मिळून बांबूने राज याला जबर मारहाण केली. विनोद याने भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत राज रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. त्यानंतर प्रणित व शाकीर या दोघांनी तेथून दुचाकीवरून धुम ठोकली. घडलेला प्रकार विनोद याने राजचा भाऊ अश्विनी सिंग याला फोन करून सांगितला. त्यांनतर अश्विनी याने घटनास्थळावर जाऊन राज याला ॲम्बुलन्स मधून ग्रामीण रुग्णालय वाई येथे नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी प्रणित गायकवाड व शाकीर खान यांनी राज सिंग याला जबर मारहाण करत त्याचा खून करून पळून गेल्याची तक्रार अश्विनी सिंग याने वाई पोलीस ठाण्यात दिली त्या तक्रारीच्या आधारे सध्या अधिक तपास वाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here