सातारा : भीषण अपघात टेम्पोसह डंपरचा चक्काचूर मात्र जीवितहानी नाही

0
576
बातम्या शेअर करा

वाई – वाई येथील पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक आयशर टेम्पो आणि डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन दोघे गंभीर तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सॅन्ड क्रश घेऊन वाईकडून पाचगणीकडे डंपर निघाला होता. तर आयशर टेम्पो (MH 25 U 0719) हा पाचगणीहून वाईच्या दिशेला निघाला होता. भरधाव वेगात असल्याने टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि घाटातील बुवासाहेब मंदिरानजीक असणाऱ्या वळणावर घाट चढणाऱ्या डंपरला जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरचालक जखमी झाला असुन आयशर टेम्पोमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पोचालकाने गाडीतून उडी मारल्याने तो बालबाल बचावला. अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून धुम ठोकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गवळी तसेच पोलीस जवान घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरु होते. यावेळी वाई आणि पाचगणीच्या दोन्ही दिशेला वाहनांची मोठी रांग लागली होती. तर बघ्यांचीही गर्दी झाली होती. तब्बल ३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here