चिपळूण – चिपळूण नागरीची ‘कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार २०२५’ पुरस्कारासाठी निवड झाली असून आज अलिबाग येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला.
विभागीय सहनिबंधक संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित अलिबाग यांच्यावतीने कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार 2025 स्वीकारताना चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुभाषराव चव्हाण, सौ. स्मिता चव्हाण,मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वप्ना प्रशांत यादव, प्रशांत यादव, अशोक साबळे, सोमा गुढेकर, राजेंद्र पटवर्धन, वैभव चव्हाण, व्यवस्थापक प्रशांत वाजे, तसेच सर्व संचालक मंडळ दिसत आहेत.