मुंबई – आर्थिक विवंचनेतून शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली अन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाचं ओझं कमी केलं आहे. संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण करणाऱ्या शिरीष महाराजांसाठी एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचललं आहे. आमदार विजय शिवतारेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना शिंदेंनी पाठवलेली 32 लाखांची रक्कम देऊ केली.
देहूतील राहत्या घरी 5 फेब्रुवारीला शिरीष महाराजांनी गळफास घेत आत्महत्या केली आणि वारकरी संप्रदयात शोककळा पसरली. ही बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समजली आणि त्यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं. ज्या कारणाने महाराजांनी आत्महत्या केली, ते कर्जाचं ओझं आज स्वतः उपमुख्यमंत्री शिंदेंनी उतरवल
संत तुकाराम महाराजांचे 11 वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना घडली. डोक्यावर असलेल्या 32 लाखांच्या कर्जामुळे हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये शिरीष महाराज मोरे यांनी नमूद केलं होतं. या घटनेच्या आधी, 20 दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होताएकनाथनाथ
शिरीष महाराज मोरेंनी कर्ज कशासाठी घेतलं?
- कोरोनाच्या आधी शिरीष महाराज मोरे व्यवसाय क्षेत्रात उतरले होते. कागदी पिशवी बनवणे अन् त्यावर छपाई करुन देण्याचा व्यवसाय सुरु केला. यासाठी त्यांनी कर्ज उचलले होते. मात्र कोरोनाच्या काळात हा व्यवसाय बंद पडला अन् महाराजांना पहिलं आर्थिक नुकसान झेलावं लागलं. अडीच वर्षांपूर्वी हॉटेल क्षेत्रात उतरण्याचं ठरवलं. नादब्रह्म ईडलीची काही लाख रुपये मोजून फ्रेंचायजी घेतली. पिंपरी चिंचवड परिसरात हा नवा व्यवसाय सुरु केला, जो आज ही सुरु आहे. आधीचं कर्ज असताना पुन्हा या व्यवसायासाठी ही महाराजांनी कर्ज घेतलं.
- काही महिन्यांपूर्वी एक मजली घर बनवलं, त्यासाठीही लाखांमध्ये खर्च झाला.