गुहागर – गुहागर तालुक्यातील देवघर विद्यालयात पाणी, स्वच्छता आणि आरोग्य याविषयी जागृती करण्यात आली तसेच गावातील महिलांसाठी सक्षमीकरण आणि व्यवसाय मार्गदर्शन उपक्रम घेण्यात आला. हे दोन्ही उपक्रम श्री सप्तेश्वर प्रतिष्ठान देवघरने हिंदूस्तान कोका कोला बेव्हरेजीस् Hindustan Coca-Cola Beverages (HCCB) या कंपनीच्या वाय फोर डी फांऊडेशनच्या (Y4D Foundation) मदतीने आयोजित केले होते.
देवघर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित वॉश या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य उत्तम रहाण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात. घरातील स्वच्छता कशी ठेवावी. दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा अतिरिक्त वापर कसा करतो. काय केले तर पाण्याची बचत होईल. त्याचे फायदे काय. या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रोजेक्टरच्या साह्याने छायाचित्र, व्हिडिओद्वारे हे मुद्दे प्रभावीपणे विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले. त्यामुळे पाणी, स्वच्छता आणि आरोग्य (वॉश) या संदर्भात कशी काळजी घ्यायची याचे आकलन विद्यार्थ्यांना झाले. यावेळी देवघर विद्यालयातील इयत्ता सातवी ते दहावीच्या 50 विद्यार्थिनींना Wash Kit देण्यात आले. या कीट मध्ये साबण, सॅनिटायझर, सॅनिटरी पॅड, टुथब्रश, टुथपेस्ट, मास्क, आदी साहित्य आहे. तसेच देवघर गावातील बचतगटांच्या महिला सदस्यांसाठी विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबीरामध्ये वॉश या उपक्रमाविषयी मागदर्शन करण्यात आले. तसेच बचतगटांनी व्यवसायाभिमुख व्हावे. महिलांना शिवणकामाची रुची असेल तर प्रशिक्षण आणि शिवणयंत्र देण्यात येतील. महिलांना घरगुती पध्दतीने निर्रजंतूक सॅनिटरी पॅट बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाई. स्वयंपाकाची रुची असलेल्यांना मसाला उत्पादनांसाठी मार्गदर्शन केले जाईल. बचतगटांच्या उत्पादनानंना बाजारपेठत माल विकण्यासाठी देखील मदत केली जाईल. अशी माहिती उत्तम जाधव यांनी दिली. गावातील 60 महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला देवघरमधील महिला ग्रामसंघाच्या प्रमुख, बचत गटांच्या महिला, आशासेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
या दोन्ही कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी कोका कोला कंपनीच्या अंतर्गत सीएसआर नियोजन करणाऱ्या वाय फोर डी फाऊंडेशनचे (Y4D Foundation) उत्तम जाधव आणि महेश राठोड सप्तेश्वर प्रतिष्ठान देवघरचे अध्यक्ष सागर गुजर, चव्हाण ,भरत गुजर, मंदार कदम, विश्वजीत कदम, कल्पेश गुजर, ऋग्वेद सकपाळ, ध्रुव सकपाळ, सर्वेश घाणेकर, यश गुजर, उपस्थित होते. तसेच महिला ग्रामसंघ प्रमुख, सर्व बचत गट च्या महिला, आशासेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.