बातम्या शेअर करा

गुहागर – व्याडेश्वर दिंडी सेवा मंडळाच्या वतीने गुहागर ते पंढरपूर पायी दिंडी वारीला सुरुवात होणार आहे.
दि. २९ जानेवारी गुहागरपासून सुरुवात दुपारी रामपूर गुढे फाटा बावा पाटेकर अल्पोपहार, रामपूर विठ्ठल मंदिर येथे विश्रांती रात्री मराठी शाळा उक्ताड मुक्काम, ३० जानेवारी रोजी दुपारी श्रीकृष्ण मंदिर मुंडे पूल रात्री मुक्काम हनुमान मंदिर पोफळी, ३१ रोजी शिवदेश्वर मंदिर कोकणवाडी, दुपारी रात्री मुक्काम वाजेदेवी मंदिर वाजेगाव, १ फेब्रुवारी रोजी दुपारी विठ्ठल मंदिर पाटण, रात्री मुक्काम नवसारी उडूगडे बंधू, २ फेब्रुवारी रोजी उंब्रज रिसवड येथे मुक्काम, ३ फेब्रुवारी रोजी रायगाव दुपारी म्हासूर्वे मुक्काम, ४ फेब्रुवारी रोजी विखळे माळी वस्ती दुपारी, रात्री मुक्काम विठ्ठल मंदिर विभूतेवाडी, ५ फेब्रुवारी रोजी दुपारी मारुती मंदिर शेणवडी, रात्री मुक्काम दिघांची, ६ फेब्रुवारी रोजी महूद बुद्रुक दुपारी, रात्री कोर्टी येथे मुक्काम, ७ फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथील संस्थेचा मठ, २२ फेब्रुवारीपर्यंत मुक्काम असे पायी दिंडी वारीचे नियोजन आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here