गुहागर – गुहागर तालुका ग्रामपंचायत युनियनची आज चिखली येथे सभा झाली या सभेत गुहागर तालुक्याची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये पुन्हा एकदा साईनाथ बागल यांची पुन्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात यावेळी सर्व ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) उपस्थित होते.
या सभेत युनियनचे यशस्वी रित्या काम पार पाडणारे अध्यक्ष आणि सचिव यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्ती देण्यात आली तसेच नवीन अनुभवी कार्यकारणीची स्थापना करण्यात आली. यापूर्वी युनियनचे अध्यक्ष म्हणून साईनाथ बागुल तर सचिव म्हणून सुरेश गोरे यांनी सुंदर कामकाज केले होते. हे लक्षात घेता तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांनी बिनविरोध पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून साईनाथ बागुल तर उपाध्यक्ष म्हणून सुरेश गोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याच बरोबर एक सक्षम कार्यकारणी नेमण्यात आली आहे. त्यामध्ये सचिव बाबुराव सूर्यवंशी, महिला उपाध्यक्ष सौ रोहिणी वारे, सहसचिव संजय गोरे, संघटक भरत घेवडे, सल्लगार कमलाकर शिरकर, सौ प्रियंका जाधव,कार्यकारणी सदस्य महेंद्र भुवड, बाळकृष्ण रायकर,सविता जोपळे,अशी कार्यकारणी बनविण्यात आली आहे.