कृषी महोत्सवाला कोकणवासीयांचा उदंड प्रतिसाद

0
100
बातम्या शेअर करा

चिपळूण –: सपूर्ण कोकणाला भुरळ घालणान्या चिपळूण येथील वाशिष्ठी कृषि व पशुधन महोत्सवाची यशस्वी सांगता शाहीर नंदेश उमप यांच्या दमदार ‘मी मराठी’ कार्यक्रमाने झाली. दरम्यान दिनांक ५ ते जानेवारी दरम्यान आयोजित कृषी महोत्सवाला कोकणवासीयांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सर्वांच्या पाठबळामुळे कृषी महोत्सव यशस्वी झाल्याचे प्रशांत यादव यांनी सांगताना आदरणीय शरद पवार यांच्या संकल्पनेप्रमाणे पुढील कृषी महोत्सवात कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रत्यक्ष बघता येईल अशा पद्धतीने करण्याचा प्रयोजन करू, अशी ग्वाही यादव यांनी ‘मी मराठी’ कार्यक्रमादरम्यान शाहीर नंदेश उमप यांच्यासह कलाकारांच्या सत्कारप्रसंगी दिली.

वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टने आयोजित केलेल्या चिपळूण येथील कृषी व पशुधन महोत्सवाला प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. रविवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते उ‌द्घाटन झाल्यानंतर सलग सुरू असलेल्या येथील कार्यक्रमांना तत्तेच पशुधन व कृषी प्रदर्शनाला तुफान गर्दी उसळताना दिसली.

रविवारी उद्घाटनाच्या दिवशी माऊलीचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी गर्दी उसळली होती अक्षरशा पंढरी अवतरल्याचे यावेळी पहावयास मिळाले. तर सायंकाळी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी यादव यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती. यादव यांना शुभेच्छा देत असताना शुभेच्छुकांनी आपण आमदार व्हावेत, अशा शुभेच्छा दिल्या.

या महोत्सवात कृषी विषयक व विविध वस्तूंचे स्टॉल, खाद्यपदार्थालाही नागरिकाची मोठी पसंती मिळाली. बचत गटांच्या महिलांना यातून मोठा फायदा झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होता आपल्याला ही एक चांगली पर्वणी मिळाल्याने लाखों लोकापर्यंत पोहचता आले असे म्हणून यादव दांपत्याचे आभार मानले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शेतकरी व सर्वसामान्य नागरिक या महोत्सवाचा आनंद लुटताना दिसले. विशेष म्हणजे तरुण-तरुणींना हा महोत्सव मोठी पर्वणी ठरली आहे.

सोमवारी मँगो इव्हेंट प्रस्तुत सेलिब्रिटी इविनिंग या कार्यक्रमाला संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला. अभिजित गोडबोले निवेदक असलेल्या कार्यक्रमाची सुरुवात गणेश गीताने झाली आणि नंतर हा कार्यक्रम तुफान रंगला. जुईली जोगळेकर हिने हिंदी मराठी तसेच रॅप साँगने अक्षरश धमाल उडवून दिली आणि तरुणाईला दिलखुलास व्यक्त होण्यासाठी जणू एक वेगळे व्यासपीठ मिळाले. जल्लोष, शिट्टयांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. लहान लहान मुलांसह तरुणाई दिलखुलास धिरकली. चिपळूणचा उत्साह पाहून कलाकारही बेहद खुश झाले. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील सुपरहिट जोड़ी प्रसाद खांडेकर व नम्रता सभेराव यांनी तर सर्वांनाच खळखळून हसवले त्यांची जुगलबंदी आणि कॉमेडीने सपूर्ण परिसरात हास्याचे फवारे उडत राहिले.

मंगळवार ते गुरुवारपर्यंत दिवसभर येथे अनेक शाळेतील विद्यार्थी महोत्सव पाहण्यासाठी आले होते. या सर्वांची प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांनी भेट घेऊन काही काळ मुलांबरोबर संवाद साधला तर विविध स्पर्धा रंगल्या. यामध्ये पशुधन संवर्धन, पाककला स्पर्धा, डॉग व कॅट शो पाहण्यासाठी गर्दी फुलून गेली होती.

या महोत्सवात पशुधनांनी सर्वांचे लक्ष वेधले. यामध्ये प्रख्यात असलेला भारत हिंद केसरी बन्सी, बकासूर, भारत, बन्सी, महिब्या या बैलाचे येथे आगमन झाले आणि तुफान गर्दी उसळली. उंट, घोडे, विविध जातीच्या गायी, म्हशी, कोंबड्या, शेळ्या, ससे पाहण्यासाठीही गर्दी होती.

वाशिष्ठी कृषी महोत्सवात उभारण्यात आलेले जुने मातीचे केंबळी घर, त्यातील रचना, भांडीकुडी पाहण्यासाठी वर्दळ होती गोठा, माचणी व परिसरातील बैल गाडी लक्षवेधी धरली होती. बाबूंचे घर विशेष म्हणजे बांबूंच्या लाकडांपासून बनवण्यात आलेले प्रवेशद्वार आकर्षण ठरले.

मंगळवारी अशोक अशोक हांडे यांचा ‘ मराठी बाणा’ कार्यक्रम मराठी संस्कृतीच्या आठवणींना उजाळा देऊन गेला. गुरुवारी रात्री शाहीर नंदेश उमप आणि कलाकारांचा मी मराठी कार्यक्रम अंगावर रोमाच फुलवून गेला. या दर्जेदार कार्यक्रमाची सांगता होताना प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. यापुढे याही पेक्षा चांगले व दर्जेदार कार्यक्रम, पशूधन आणून शेतकऱ्यााना मार्गदर्शन केले जाईल तसेच कृषी महोत्सव लाईव्ह करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here