चिपळूण – चिपळूण येथे वाशिष्टी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट यांच्यामार्फत ५ जानेवारी ते ९ जानेवारी कालावधीमध्ये भव्य कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवात स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. तसेच दिनांक ६ रोजी डॉग तर ७ रोजी कॅट शो चं आयोजन करण्यात आले आहे दोन्ही शो दोन सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहेत, अशी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव तसेच मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
गेल्या वर्षी कृषी महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी देखील कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे. या महोत्सवात मनोरंजनात्मक कार्यक्रमांबरोबरच स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. गेल्या वर्षी डॉग व कॅट शो चं आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गेल्यावर्षी ५० डॉग व ४० कॅट सहभागी झाले होते.
यानुसार दि. ६ रोजी डॉग शो सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे. यामध्ये विविध जातीचे डॉग व कॅट असणार आहेत यातून डॉग व कॅट च्या जातीची ओळख होण्यास मदत होणार आहे. यामध्ये पिङबुल, ब्लॅक जर्मन क्लार्ड रेटिरियर, मिनी पमेरिया, गोल्डन रॉट विलेन, बेल्जियन शेफर्ड आदी डॉग असणार आहेत. रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कॅट-शो होणार आहे. डॉग व कॅट शोचे सर्वांना आकर्षण असणार आहे. तरी या शोमध्ये सहभागी होण्यासाठी डॉग व कॅट मालकानी
9422661197
7588330011
9890393823
7722045048 नोंदणी करावी. तसेच हा शो पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे करण्यात आले आहे.