गुहागर – रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या एमकेसीएल अधिकृत प्रशिक्षण केंद्रांची विभागीय बैठक नुकतीच कुडाळ येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरच्या उल्लेखनीय कामगिरीचा विशेष सन्मान करण्यात आला.
युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरच्या तीन शाखा असून एक कॅनरा बँकेच्यावर शृंगारतळी येथे, दुसरी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर चिपळूण येथे तर तिसरी नातू प्रतिष्टानच्या इंग्लिश मेडियम स्कूल, मार्गताम्हाने येथे कार्यरत आहे. या केंद्रांच्या माध्यमातून आजवर हजारो विद्यार्थ्यांना संगणक साक्षरतेचे धडे मिळाले आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील संगणक साक्षरता वाढवून, विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वर्ष २०२४ मध्ये एमकेसीएल(MKCL) च्या विविध कोर्सेसच्या प्रवेश, प्रशिक्षण,परीक्षा व प्लेसमेंट या बाबतीत संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसाठी परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या विकासाला व रोजगारक्षमतेला केंद्रस्थानी ठेऊन व्यवसायिक निष्ठा जोपासत आजवर अनेक विद्यार्थ्यांना सक्षम बनविले आहे व त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना डिजिटल विश्वात प्रगती साधण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला आहे. एमकेसीएल च्या विविध कोर्सेसची व कार्यक्रमांची चोख अंमलबजावणी करताना त्याची विश्वसनीयता आणि पारदर्शकता वाढवत ठेवण्याची जबाबदारी पार पाडत असताना एमकेसीएलच्या उद्दिष्टांना साकार करण्यात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे प्रा.जहूर बोट व त्यांच्या सहकाऱ्यांचा विशेष सन्मान एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. वीणा कामत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून करण्यात आला. या वेळी एमकेसीएलचे पदाधिकारी आदरणीय अतुल पतोडी , अमित रानडे , नटराज कटकधोंड, तुषार निकम ,कोकण विभागाचे मंगेश जाधव , जिल्हा समन्वयक संतोष कोलते आणि प्रणय तेली यांची उपस्थिती होती. संस्थेच्या या भरीव कामगिरीसाठी सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.