चिपळूण ; वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे ५ ते ९ जानेवारी रोजी “वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन” कृषी महोत्सव २०२५ चे आयोजन

0
80
बातम्या शेअर करा

चिपळूण – वाशिष्टी डेअरी प्रकल्प आयोजित गेल्या वर्षी मिळालेल्या ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शनाला’ अभूतपूर्व प्रतिसादानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात दि. ५ ते ९ जानेवारी २०२५ रोजी चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन २०२५ ” कृषी महोत्सव बहादूरशेखनाका येथील वि. दा. सावरकर मैदानात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांनी दिली. या महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाबरोबरच आणखी रोजगाराच्या आणखी वाटा निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोकणात दुग्धव्यवसाय यशस्वी होत नाही, अशी नकारात्मक भावना गेल्या अनेक वर्षांपासून रुजलेली आहे. मात्र, याला छेद देत परिपूर्ण आणि अत्याधुनिक दुग्धप्रकल्पाची उभारणी करून सातत्यपूर्ण सर्वोत्कृष्ट दर्जेदार उत्पादनांमुळे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. हा प्रकल्प यशस्वीपणे दिमाखदार वाटचाल करीत आहे. कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना आर्थिक समृद्धी मिळवून द्यावी, इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, हे स्वप्न उराशी बाळगून स्टेट बँक ऑफ इंडिया, बहादूरशेखनाका येथील बँकेच्या अर्थ साहाय्याने वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्ध प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. ७ सप्टेंबर २०२१ रोजी चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि. चिपळूणचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. नियोजनबद्ध कामामुळे अतिशय कमी कालावधीत अत्याधुनिक वाशिष्ठी दुग्धप्रकल्प उभा राहिला. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी शेतकऱ्यांसाठी रुजू झाला.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. तर दुसरीकडे वाशिष्ठी डेअरी प्रकल्पामुळे शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र, इतक्यावरच वाशिष्ठी डेअरी प्रकल्प थांबला नाही. तर गेल्या वर्षी शेतकऱ्यांना शेती पूरक दुग्ध व्यवसायाबरोबरच येथील शेतकरी आर्थिकदृष्टीने सक्षम झाला पाहिजे. शेतकऱ्यांना रोजगाराच्या वाटा निर्माण होण्याच्या दृष्टीने वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे गेल्या वर्षी चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. या महोत्सवाचे कृषी क्षेत्रातील तज्ञांनी भरभरून कौतुक केले आहे.

गेल्या वर्षीच्या कृषी महोत्सवामुळे शेतकरी शेती पूरक दुग्ध व्यवसायाबरोबरच अन्य व्यवसायाकडे वळले असून शेतकरी स्वावलंबी होत असल्याचे पाहून समाधान होत आहे. तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गेल्या वर्षी प्रमाणे कृषी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी दोन दिवस वाढविण्यात आले आहेत. या कृषी महोत्सवाचा कोकणातील शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करतांना शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवात सहभागी व्हावे. तसेच स्टॉल नोंदणीसाठी
9422661197
9637605757
7588330011
9890393823
7722045048 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.

या कृषी प्रदर्शनात १०० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असेल. पशुपक्षी प्राणी प्रदर्शन,प्रि फॅब्रिकेटेड स्टॉल्स, वैविध्यपूर्ण अवजारे तसेच महिला बचत गटांकरिता स्टॉल मोफत असणार आहेत, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here