गुहागर – राज्य परिवहन महामार्ग विभागाने १५ जुलै २०२४ पासून आगार निहाय *प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाचे* नियमित केले असल्याने आता रत्नागिरी एसटी महामंडळाकडून डिसेंबर २०२४ मध्ये करण्यात येणा-या प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे देण्यात आले आहे. या मध्ये गुहागर आगारातील प्रवाशी राजा दिन हा 30 डिसेंबर रोजी साजरा कऱण्यात येणारं आहे.
या आधी सुद्धा या गुहागर आगारात प्रवासी दिन साजरा करण्याचे वेळापत्रक अनेक वेळा देण्यात आले मात्र ऐनवेळी वेळापत्रक बदलून प्रवाशांची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे प्रवासी दिन कधी साजरा झाला हे प्रवाशांना कळतच नव्हते. आता या दिवशी मात्र सर्व प्रवासी संघटना आणि प्रवासी नागरीक प्रवासी दिनासाठी हजर राहणार असल्याचे कळते. मात्र असे असले तरी प्रशासनाने मात्र ऐनवेळी तारीख बदलू नये एवढे मात्र खरे…..