गुहागर ; प्राध्यापकांना मारहाण प्रकरणी आज निषेध मोर्चा

0
441
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर येथील खरे-ढेरे भोसले महाविद्यालय येथे कार्यरत प्राध्यापकांना गुहागर एज्युकेशन संस्थेच्या पदाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या विरोधात होणाऱ्या तक्रारीबाबत गैरसमज करुन घेऊन दि. १८ डिसेंबर रोजी अमानुषपणे विद्यार्थ्यांसमोर मारहान करुन जखमी केले. दि. १९ रोजी पोलिस उपनिरीक्षक सुजय सोनवणे व त्यांचे सहकारी घटनेचा पंचनामा करण्यासाठी कॉलेजमध्ये पोहोचले. त्यावेळी संघटनेचे पदाधिकारी चिपळूणहून उपस्थित होते. या मारहाणीच्या प्रकरणानंतर कॉलेजमध्ये स्मशान शांतता होती, सर्वजण दहशती खाली आहेत, वर्ग चालू नाहीत, काही प्राध्यापक लायब्ररीत होते, इथे पुन्हा सन्मानाने काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी मुंबई विद्यापीठातील सर्व प्राध्यापक या घटनेनंतर एकत्रित आल्याचे दिसून येतात.

सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, पालक व कर्मचारी प्रचंड दहशतीखाली आहेत. अद्याप हल्लेखोरांना पोलिसांकडून अटक झालेली नाही. त्यामुळे येथील इतर शिक्षक व यांना धीर व अधार देण्यासाठी तसेच या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि प्राध्यापकांना नैतिक आधार देण्यासाठी बॉम्बे युनिव्र्व्हसिटी कॉलेज अॅण्ड टीचर्स युनियनच्या वतीने आज २१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २ ते ४:३० वाजताच्या दरम्यान प्राध्यापक, विद्यार्थी, पालक यांचा निषेध मोर्चा संबंधित कॉलेज ते गुहागर तहसिलदार कार्यालय दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि भविष्यातील शिक्षणव्यवस्थेतील कर्मचाऱ्यांसाठीचे धोके ओळखून विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी वेळ काढून न चुकता आज दुपारी २ वाजता मोठ्या संख्येने खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय, गुहागर येथे गेट समोर उपस्थित रहावे व जखमी प्राध्यापक सहकाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन बुक्टू तर्फे डॉ. गुलाबराव राजे आणि प्रा. चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या मार्फत करण्यात आले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here