चिपळूण ; जमिनीच्या वादातून तनाळी येथे हाणामारी तीन महिलांसह सात जणांवर गुन्हे दाखल

0
417
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील तनाळी येथे एकाच कुटुंबात जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीप्रकरणी परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दीपेश दत्ताराम झगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकनाथ शंकर झगडे संकेत एकनाथ झगडे व अन्य दोन महिलांवर हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच एकनाथ शंकर झगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दत्ताराम रामचंद्र झगडे, दिपेश दत्ताराम झगडे व एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. दीपेश झगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वडिलोपार्जित जागेमध्ये एकनाथ झगडे हे जेसीबीच्या सहाय्याने काम करीत होते. त्यावेळी त्यांना वडिलोपार्जित जागा असताना तुम्ही आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना न देता या जागेमध्ये काम का करीत आहात, असे विचारले. त्याचा राग येऊन मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नुकसान केले.

एकनाथ झगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आपल्या मालकीच्या वडिलोपार्जित जागेमध्ये जेसीबी आणून साफसफाई करीन असताना दत्ताराम रामचंद्र झगडे , दिपेश दत्ताराम झगडे व एक महिलेने तेथे येऊन ‘ही जागा आमची आहे. तुम्ही साफसफाईचे काम का करीत आहात, असे बोलून शिवीगाळ करत मारहाण केल्याचे म्हटले आहे. तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याचेही म्हटले आहे.

आणि दत्त जयंतीच्या उत्सवात तनाळी गावात हा प्रकार घडला आहे. त्यामुळे सर्वत्र संताप आणि नाराज व्यक्त करण्यात येत आहे. चिपळूण पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here