गुहागर – गुहागर तालुक्यातील पोमेंडी गावामध्ये काल मध्यरात्री गाईंच्या तस्करीचा प्रयत्न रायगड मधील दलालाच्या साथीने, चिपळूण तालुक्यातील आणि गुहागरमधील काही स्थानिक करत होते. तो हाणून पाडण्यात स्थानिकांना यश आले.
गुहागर तालुक्यातील पोमेंडी गावामध्ये रायगड मधील जावेद नावाचा दलाल चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने मधील पालशेतकर आडनावाचा दलाल आणि त्याचबरोबर गुहागर तालुक्यातील पोमेंडी गावातील काही स्थानिक आरोपी हे एकत्रित या गाईंची तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री, पोमेंडी येथील स्थानिक रहिवासी श्रीराम विचारे यांच्या लक्षात आले. ही तस्करी रोखण्याचा श्रीराम विचारे आणि त्यांच्या सहका-यानी प्रयत्न केला. यावेळी या तस्करांकडून विचारे यांना पैशाच्या स्वरूपात लाच देण्याचाही प्रयत्न करण्यात आला मात्र विचारे दाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर या तस्करांनी येथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विचारे यांनी पोलीस हेल्पलाइन नंबरला कॉल करून ही गाडी आणि त्यामधील तस्कर यांना पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले.यानंतर या सर्वांना गुहागर पोलिस स्थानकात आणण्यात आले. या धावपळीमध्ये या गाडीतील एका गाईचा मृत्यू झाला.मृत्यू झालेल्या गाईला संबंधितांकडून पोलिसांच्या सूचनेनुसार दफन करण्यात आले.
देशांमध्ये गोमातेच्या तस्करीची आणि गोहेत्तेची अनेक प्रकरण होत असताना गुहागर तालुक्यासारख्या ग्रामीण भागात सुद्धा हे पेव पोहचलेले असल्याचे भयानक सत्य यावेळी समोर आले आहे.अशी हिम्मत पुन्हा कोणी करू नये, गोमातेच्या तस्करीला आळा बसावा याकरता भारतीय जनता पार्टीच्यावतीने तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या नेतृत्वात गुहागर पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनाद्वारे अटक केलेल्या या गोमातेच्या तस्करांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आणि त्याचबरोबर या शिक्षेची जबर अशी बसली पाहिजे की अशी हिम्मत पुन्हा कोणीही करता कामा नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
गोमातेची विक्री करणाऱ्या, वाहतूक करणाऱ्या, खरेदी करणाऱ्या दलालांवर जशी कारवाई करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आपले गोधन या कसायांच्या हाती देणाऱ्या गोमातेच्या मालकांना सुद्धा त्याच पद्धतीने समज देण्याची, शिकवण देण्याची गरज असल्याचे यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी म्हटले आहे.