शरद पवारांची कधीही साथ सोडणार नाही! – प्रशांत यादव

0
188
बातम्या शेअर करा

चिपळूण – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची जपणूक करत देश- महाराष्ट्र उभा करण्याचे मोठे काम शरद पवार यांनी केले आहे. शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश ते निवडणूक प्रचार, मतमोजणी व पराभवानंतर शरद पवार यांचे मोठे पाठबळ मिळाले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी शरद पवारांच्या वाढदिनी हॉटेल अभिरुचीच्या सभागृहात ज्येष्ठांच्या सन्मान सोहळ्यात प्रतिपादन करतांना शरद पवारांची कधीही साथ सोडणार नाही, अशी ग्वाही यादव यांनी यावेळी दिली.

निवडणुकीच्या पराभवानंतर आपण भाजपमध्ये जाणार अशा अफवा, चर्चा सुरू होत्या. मात्र, शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली ९० हजार लोकांनी आपल्यावरती प्रेम केलं. या प्रेमातून उतराई होण्यासाठी दुसऱ्या कुठे जायचे गरज नाही. या मंडळींच्या हृदयात जे स्थान आहे. हीच मोठी आपल्या कामाची पोच पावती आहे. विचारांची लढाई लढलो. प्रचंड मोठी दरी होती. काय होणार ? या सगळ्या गोष्टीची कल्पना होती. किती ताकद समोरच्याकडे याची मला कल्पना होती. तरीसुद्धा मला माहित होतं की मी लढणार आहे ती माझ्या विचारांची लढाईसाठी आणि आज तीच लढाई मला पुढे घेऊन जायचे राजकीय स्थित्यंतर बदलतील राहतील काही माहित नाही. त्या राजकीय स्थित्यंतरामध्ये आपलं भविष्य काही आहे ते माहीत नाही. पण एक मात्र निश्चित आहे, की ज्या लोकांनी साथ केली. त्या लोकांचा विश्वास जपण्याचं काम ह्या पुढच्या काळात करत राहणार!

शरद पवारांसोबत पुढच्या काळात राहणार असून आपल्याला या ठिकाणी सांगतो ज्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकीत दिवसरात्र मेहनत घेतली. त्या प्रत्येक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या सोबत राहणार आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्याला जिथे जिथे शक्य आहे, तिथं ताकद देण्याचं काम करणार, अशी ग्वाही यादव यांनी यावेळी शेवटी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. दीपिका कोतवडेकर, सुमती जांभेकर, वासुदेव मेस्त्री, माजी नगरसेवक शिरीष काटकर, ज्येष्ठ पत्रकार सुहास बारटक्के आदींनी मनोगते मांडली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रमेश कदम, चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार, माजी नगरसेवक शिरीष काटकर, ज्येष्ठ नेते सुचय रेडीज, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. दीपिका कोतवडेकर, शहराध्यक्षा डॉ. रेहमत जबले, शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख विनोद झगडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराव देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विलास चिपळूणकर, माजी नगरसेवक अविनाश केळस्कर,सिकंदर नाईकवाडी, सुरेश मांदाडकर, दिनेश शिंदे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालिका माधुरी गोखले, चिपळूण नागरीच्या संचालिका ऍड. नयना पवार, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष महंमद पाते, ज्येष्ठ पत्रकार सुहास बारटक्के, युवक तालुकाध्यक्ष रोहन नलावडे, राष्ट्रवादी महिला आघाडी तालुका कार्याध्यक्ष अंजली कदम, शहर कार्याध्यक्ष रुही खेडेकर, मेस्त्री समाजाचे नेते वासुदेव मेस्त्री, राष्ट्रवादीचे तालुका खजिनदार शमून घारे, माजी नगरसेविका सीमा चाळके, कोवसच्या सुमती जांभेकर, राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष राहुल पवार,राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते , राष्ट्रवादी युवकचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गुलजार कुरवले, भिलेच्या सरपंच आदिती गुढेकर, अफजल कच्छी आदी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here