रत्नागिरी ; जिंदाल कंपनीत वायू गळती शाळेतील 30 पेक्षा जास्त विद्यार्थी अस्वस्थ

0
172
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे असणाऱ्या जिंदाल कंपनीतील वायू गळतीने कंपनी शेजारील असणाऱ्या एका शाळेमधील 30 विद्यार्थी अस्वस्थ झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या विद्यार्थी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित विद्यार्थी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

जयगड येथील जिंदाल कंपनीत टँकरमध्ये वायू भरताना गळती झाल्याने परिसरातील शाळकरी विद्यार्थांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. विद्यार्थांना अस्वस्थ वाटू लागल्याने लगेच पालक व शिक्षकांनी जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती रत्नागिरी उपविभागिय अधिकारी जीवन देसाई आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. विद्यार्थांच्या प्रकृतीकडे बारकाईन लक्ष देण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here