गुहागर ; हे सरकारी कार्यालय गेल्या पाच दिवसापासून बंद अवस्थेत.. कारण अस्पष्ट

0
286
बातम्या शेअर करा

गुहागर – गेल्या चार दिवसापासून भारत सरकारचे एक गुहागर तालुक्यातील महत्त्वाचा कार्यालय बंद आहे….. हे कार्यालय का ? बंद आहे. हे कार्यालय उघडणार आहे.? की नाही किंवा हे कार्यालय कायमस्वरूपी बंद केलं का? असे प्रश्न त्या निमित्ताने उभे राहिले.

गुहागर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणरे बीएसएनएल सेवेचे हे आहे कार्यालय….. हे कार्यालय सोमवारपासून जवळपास आज पाच दिवस होत आले पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी एखादा बीएसएनएलचा ग्राहक तक्रार देण्यासाठी गेला असता त्या कार्यालयाला कुलूप असल्याचे दिसून येत आहे.परिणामी हे कार्यालय शासनाने कायमस्वरूपी बंद केले का ? किंवा बीएसएनएल कंपनी यापुढे जे आपले सर्व ग्राहक आहेत. त्यांना यापुढे सेवा देणार आहे की नाही ? असे प्रश्न त्या निमित्ताने उभे राहिलेत या ऑफिसमध्ये बीएसएनएल सिम 4जी करणे तसेच लँडलाईन बिल या संदर्भात अनेक तक्रारी किंवा 5जी नेटवर्क हवे असेल. तर कसा अर्ज करावा अशा अनेक तक्रारीसाठी जुने ग्राहक आणि नवीन ग्राहक घेत असतात. मात्र हे कार्यालयात बंद असल्याने आता गुहागर तालुक्यातील बीएसएनएलच्या ग्राहकांनी संपर्क कुठे साधायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.? तरी हे कार्यालय का ? बंद आहे येथील अधिकारी कुठे ?आहेत. याबाबत त्वरित यांच्या वरिष्ठांनी खुलासा करावा अशी मागणी येथील ग्राहक करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here