आमदार भास्कर जाधवांनी नौटंकी बंद करावी- निलेश सुर्वे

0
376
बातम्या शेअर करा


गुहागर – महायुतीचे उमेदवार राजेश बेडल यांचा विजय निश्चित असून गुहागर विधानसभेमध्ये भाजप आपल्याला मदत करेल, अशी नौटंकी आमदार भास्कर जाधव यांनी करू नये, अशी प्रतिक्रिया भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. निलेश सुर्वे यांनी महायुतीचे उमेदवार राजेश बेडल यांचा विजय निश्चित झाला आहे.


या महायुतीमध्ये विद्यमान आमदार जाधव मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते असे भासवत आहेत की, भारतीय जनता पार्टी मला मदत करील. मी कधीही त्यांचे मन दुखावले नाही. त्यामुळे ते पूर्व इतिहासाचा दाखला देत आहेत. त्या त्या वेळेला भूमिका बजावल्या होत्या त्या खऱ्याही असतील. एककाळ असा होता की, विधानसभेचे उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जो बाळासाहेबांचे शिवसैनिक भास्कर जाधवांना मिळाला होता. ते भास्कर जाधव आणि आताचे भास्कर जाधव वेगळे आहेत. खरं म्हणजे २००९मध्ये निवडणुकीपर्यंचा माहोल वेगळा होता, परंतु त्यानंतर गुहागर विधानसभेचा आमदार आहे, अशा भूमिकेतून वागण्यापेक्षा मी राष्ट्रवादीचा आमदार आहे, मी जाधव आमदार आहे. अशा पद्धतीतून भास्कर जाधव तुम्ही वागलेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फोडायची जोरदार मोहीम आखली होती. गुहागर तालुक्यातील विधानसभेतील विविध व्यावसायिकांना धाक दाखवून आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न केला आणि भाजप कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. तो प्रसंग भाजपमधील कुठलाही कार्यकर्ता विसरणार नाही

डॉक्टर तात्या नातू व डॉ. विनय नातूंनी भाजपच्या विविध कार्यकर्त्यांना न्याय देत विविध पदे दिली. त्या सर्वांना आमिषे दाखवून आपल्या पक्षात घेतले. मात्र एकदाच. जाधवांनी त्या माणसांकडे जाऊन बघावे, त्यांची काय हालत आहे ती, तुम्ही त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवलीत, परंतु कोणतीही पूर्तता केली नाहीत. ती मंडळी आता घरी बसली आहेत. आमचे शिरस्त नेतृत्व ज्यांना जगाने गुरू मानले त्या मोदींची टिंगलटवाळी केलीत. फडणवीस यांची उपासना केलीत, डॉ. विनय नातूंना काय वाटेल ते बोललात, हे भाजप कधीही विसरणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर तुमचा पराभव स्पष्ट दिसू लागला आहे, म्हणून तुम्ही अगतीकपणे भाजप मला मदत करेल, असे सोशल मीडियावर सांगून या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करीत आहात, असे श्री. सुर्वे म्हणाले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here