गुहागर – गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रमोद गांधी यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे गुहागरच्या दौऱ्यावर येत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानसभा निवडणुकीत राज्यभरात स्वतंत्र लढत अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना जोरदार मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघ आणि दापोली विधानसभा मतदारसंघ या ठिकाणच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी 8 तारखेला सकाळी 10 वाजता राज ठाकरे गुहागर मध्ये एक मोठी जाहीर सभा घेणार आहेत.
गुहागर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रमोद गांधी व दापोली खेड विधानसभा सभेचे मनसे उमेदवार संतोष आबगुल व यांच्या प्रचारासाठी गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश मीडीयम स्कूल, पाटपन्हाळे, श्रृंगारतळी येथे ही जाहीर सभा होणार आहे.
राज ठाकरे यांची सभा रत्नागिरी जिल्ह्यात होणार असल्याने राज ठाकरे या सभेमध्ये नक्की कोणाचा कसा समाचार घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.