गुहागर – गुहागर विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडी कडून आमदार भास्कर जाधव आणि महायुतीकडून राजेश बेंडल हे दोन उमेदवार उभे आहेत. मात्र याचवेळी अजून एक अपक्ष उमेदवार उभे आहेत. ते म्हणजे संतोष जैतापकर.. मात्र याच बंडोबांना थंड करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे खरोखरच हे बंडोबा थंड होणार का..? याकडेच संपूर्ण गुहागर तालुक्याचे लक्ष लागून राहिला.
गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकवटून महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांना निवडून देण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.याच महायुतीला अडसर ठरत आहे. तो म्हणजे भाजपचे अपक्ष उमेदवार संतोष जैतापकर… यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत या मतदारसंघात बंड केल आहे. त्यांचं बंड जर कायम राहिल तर या मतदारसंघात आमदार भास्कर जाधव यांचा विजय सोपा होणार आहे. त्यामुळे संतोष जैतापकर यांचं बंड मोडून काढण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्यासह मंत्री उदय सामंत हे जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे उद्या संतोष जैतापकर उमेदवारी अर्ज माघारी घेणार का याची चर्चा सध्या संपूर्ण गुहागर मतदारसंघात सुरू आहे.
संतोष जैतापकर यांनी या विधानसभेत उमेदवारी मिळवण्यासाठी शिंदे गटाचे दरवाजे सुद्धा ठोठावले होते असे त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर उघडपणे सांगत आहेत. तर आगामी काळात संतोष जैतापकर यांना योग्य तो मानसन्मान दिला जाईल असे सांगत त्यांचं बंड थंड करण्याचं काम भाजपचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते करत आहेत. संतोष जैतापकर यांना मानणारा मोठा वर्ग गुहागर तालुक्यात आहे. त्यामुळे संतोष जैतापकर बंड करणार का ? किंवा उमेदवारी अर्ज मागे घेणार का .? यावर सध्या गुहागर तालुक्यात पैजावर पैज लावण्यात येत आहेत.