रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदी अविनाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
अविनाश पाटील हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कराड येथील रहिवासी. पोलीस खात्यात ज्यावेळी त्यांची निवड झाली त्यावेळी ते रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील पोलीस स्थानकात कार्यरत होते. त्या ठिकाणी त्यांनी अतिशय जबरदस्त अशी कामगिरी केली त्याच कामगिरीच्या बदल्यात त्यांचे प्रमोशन होऊन त्यांना मुंबई येथील बदलापूर पोलीस स्टेशन बदली झाली. बदलापूर येथे अनेक अट्टल गुन्हेगारांना मोका अंतर्गत कारवाई करत त्यांच्यावर धाक बसवला त्यानंतर त्यांची रायगड जिल्हयातील नेरळ येथे त्यांनी कोरोना काळात चांगली कामगिरी केली. त्यांनतर सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी येथे त्यांची बदली झाली. सांगली येथे काही वर्ष आपली सेवा बजावून नुकतेच मुंबई क्राईमब्रांच येथे त्यांची बदली झाली होती. मात्र आता प्रमोशन मिळाल्यानंतर त्यांना रत्नागिरी डीवायएसपी पदी निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.