देवगड – सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड येथे मच्छीमारीसाठी गेलेल्या गुहागर तालुक्यातील साखरीआगार मच्छीमार बोटीवरील तांडेलचा परप्रांतीय कामगाराने खून केल्याची घटना आज घडली.दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने साखरीआगर गावावर शोककळा पसरली आहे.
देवगड परिसरात मच्छीमारी करण्यासाठी गेलेल्या बोटीवरील परप्रांतीय खलाशाने आज दुपारी आपल्याच बोटीचा तांडेल असलेल्या साखरीआगार येथील रवींद्र नाटेकर यांचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर बोटही पेटवून दिली. या घटनेमुळे सर्वच मच्छीमारांना धक्का बसला आहे.
गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथे रहाणारे रविंद्र नाटेकर हे रत्नागिरी येथील राजिवड्यातील एका बोटीवर तांडेल म्हणून नोकरीला आहेत. आज देवगड परिसरात मच्छी मिळत असल्याचे संदेश आल्यावर खोल समुद्रात मच्छीमारीला गेलेल्या अनेक बोटी देवगड परिसरात गेल्या. यामध्ये नाटेकर यांचीही बोट होती. दुपारी याच बोटीवरील परप्रांतिय खलाशाने तांडेलचा खून केला. त्यांचे शीर धडावेगळे करुन बोटीवर ठेवले. एवढे करु हा खलाशी थांबला नाही. त्याने आपल्याच बोटीलाही आग लावली. त्यामुळे बोटीवरील अन्य खलाश्यांनी आजूबाजूच्या बोटीने मदत करत सुखरूप बंदरात आणले सध्या परप्रांतीय खलाशाला देवगड पोलिस आणि ताब्यात घेतली असून अधिक तपास करत आहेत.