गुहागर विधानसभा ; महायुतीचा उमेदवार ठरला.. उद्या भरणार उमेदवारी अर्ज

0
680
बातम्या शेअर करा

गुहागर – निवडणूक जाहीर झाल्यापासून गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुती कडून नक्की कोण.? उमेदवारी लढणार याची चर्चा सुरू होती.

महायुतीकडून गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपने पहिल्या दिवसापासून या जागेवरती दावा सांगितला होता तर काही दिवसानंतर शिवसेनेकडून या जागेवर दावा सांगण्यात आला. शिवसेनेकडून अनेक नाव ही इच्छुक यादीमध्ये घेण्यात आली होती.

गुहागर ; हे इच्छुक उमेदवार आमदारकीची निवडणूक लढणार की नाही.. की फक्त हवाच करणार…!

दोन दिवसांपूर्वी गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राजेश बेंडल यांना गुहागरची उमेदवारी मिळणार अशी जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर भाजपने सुद्धा या जागेवरचा दावा सोडला नव्हता, अखेर राजेश बेंडल यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली असून पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 28 रोजी सकाळी 11 वाजता गुहागर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत…. आता महायुतीमध्ये भाजप शिवसेनेला कशी मदत करणार..? प्रचाराची रणधुमाळी कशी आखणार ..? याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here