गुहागर विधानसभा मतदारसंघ ; इतना सन्नाटा क्यू है भाई…. या पक्षाचे कार्यकर्ते करू लागले चर्चा.

0
480
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून कोण.? लढणार असा प्रश्न एकीकडे अनेक राजकीय नेत्यांना पडला असतानाच आज गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या पक्षप्रवेशानंतर मात्र महायुतीतील सहयोगी पक्ष असलेल्या भाजपामध्ये मात्र एक प्रकारचा सन्नाटा निर्माण झालाय त्यामुळे सध्या तरी सगळेच भाजपचे कार्यकर्ते इतना सन्नाटा क्यू हे भाई असेच म्हणताना दिसत आहेत.

गुहागर विधानसभा मतदारसंघ ; शिवसेनेचे नवी खेळी… या राजकीय नेत्यांनी केला पक्ष प्रवेश… उमेदवारी मिळण्याची शक्यता.?

गुहागर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत महायुतीकडून कोण लढणार याची चर्चा गेल्या अनेक दिवस सुरू आहे. निवडणुकीची घोषणा झाली मात्र या मतदारसंघात आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात नक्की कोण.? निवडणूक लढणार हे अद्याप महायुतीकडून फिक्स झाले नसले तरी कुणबी समाजाचा उमेदवार म्हणून राजेश बेंडल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच मागील सहा महिन्यापासून भाजपचे माजी आमदार विनय नातू हे गुहागर विधानसभा मतदारसंघात चांगल्या प्रकारे सक्रिय होऊन त्यांनी जवळपास मतदारसंघाची बांधणी केली होती. आणि आता निवडणुकीच्या वेळी त्यांना सीट मिळणार की नाही. हे निश्चित नसल्याने आणि नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाल्याने आता नक्की उमेदवार कोण निवडणूक लढवणार यावर सर्वच महायुतीतील कार्यकर्ते नाक्या नाक्यावर चर्चा करताना दिसत आहेत. त्यात त्यात गेली सहा महिने भाजपचे कार्यकर्ते माजी आमदार विनय नातू यांच्यासोबत विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत असतानाच अचानक हा राजकीय घोळ निर्माण झाल्याने या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची शांतता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांना अजूनही नक्की काय होणार कोणाला तिकीट मिळणार .? याची निश्चित माहिती मिळत नसल्याने या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे सन्नाटा निर्माण झालाय त्यामुळे सध्या नाक्या नाक्यावर इतना सन्नाटा क्यू है भाई असेच ऐकू येत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here