गुहागर ; सचिन टक्के सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

0
62
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील शिर गावचे रहिवासी व प्रसिद्ध हेअर आर्टिस्ट सचिन टक्के यांच्या सामाजिक संस्थेच्या वतीने गुहागर तालुक्यातील शिर येथील आदर्श केंद्र शाळा शिर नंबर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कोकणातील भाजप 30 वरुन 12 टक्केवर..!

शारदा उत्सव व सरस्वती पूजन या दिवसाचे अवचित साधून आमदार मागाठाणे विभाग प्रकाश सुर्वे व युवा कार्यकारणी सदस्य राज सुर्वे यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या ,पेन ,पेन्सिल ,चॉकलेट्स व सचिन सामाजिक शैक्षणिक संस्था यांच्या सहकार्याने शालेय भेटवस्तू देण्यात आल्या त्याचबरोबर शाळेसाठी विजय ताम्हणकर यांच्यावतीने शुद्ध पाण्यासाठी एक्वागार्ड मशीन देण्यात आली यावेळी शाळेचे संचालक मंडळाचे अध्यक्ष विनय गुरव ,अजय पाटील ,अनिल बेर्डे, सुरेश टक्के ,उपसरपंच अमित साळवी ,सचिन सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष सचिन टक्के, मुंबई संदेश वाटकर व मुख्याध्यापक सुहास गायकवाड गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.
सचिन टक्के सामाजिक संस्था मुंबईच्या वतीने दरवर्षी कोकणातील अनेक शाळांमध्ये अनेक उपक्रम राबविले जातात तसेच त्यांची ही संस्था लहान मुलांना फ्री हेअर कट ही देते गेली 16 वर्ष ते हे काम मुंबईत करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ते हेअर आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या उत्पन्नातील काही भाग सामान्य लोकांसाठी खर्च व्हावा त्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून ते काम करत असतात.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here