खेड ; मच्छीमार होडीला चोरीच्या वाळूच्या ट्रोलरची धडक..

0
160
बातम्या शेअर करा

खेड – जगबुडी खाडीत काळोख्या रात्री मच्छीमार होडीला चोरीच्या वाळूने भरलेल्या ट्रोलरची धडक बसली. या अपघातात मच्छीमारासह होडी उलटली. उलटलेल्या होडीच्या आधाराने चार तास मच्छीमार खाडीच्या पाण्यात पोहत राहिल्यानंतर दुसऱ्या ट्रोलरच्या खलाशी यांनी त्याला मदत करुन जीव वाचवला आहे. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली.

खेड तालुक्यातील तुंभाड भोईवाडी येथील एक मच्छीमार जगबुडी खाडीत छोट्या होडीने मच्छीमारी साठी गेला होता. त्याने खाडीत जाळे टाकून मच्छी मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी जगबुडी खाडीतून चोरीच्या वाळूने भरलेला एक ट्रोलर बाजूने वेगाने जात होता. या ट्रोलरने अचानकपणे दिशा बदलून थेट मच्छीमारी करणाऱ्या होडीला धडक दिली. यावेळी होडी उलटून गेली. तेथून ट्रोलरवरील खलाशांनी पलायन केले. तेव्हा होडीतील मच्छीमारी करणारा नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवण्यासाठी धडपडत होता. त्याने उलटलेल्या बोटीच्या आधाराने पोहून एकाच जागी चार तास काढले. त्यानंतर तेथे आणखीन एक ट्रोलर येत होता. या ट्रोलर वरील खलाशी यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी बुडत असलेल्या मच्छीमाराला मदत करत वाचवले. त्याचबरोबर उलटलेली होडी सुस्थितीत करुन दिली. त्यावेळी मच्छीमार घराकडे सुखरुप परतला. रात्रीच्यावेळी घडलेली घटना मच्छीमाराने वाडीतील ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर संपूर्ण वाडीने मिळून थेट खेड पोलीस ठाणे गाठून याची फिर्याद दाखल केली आहे. त्याशिवाय महसूल यंत्रणेचे प्रमुख तहसीलदार यांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांसह महसूल विभागाने कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here