गुहागर – गुहागर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सध्या एक नाव चर्चिले जात होते ते म्हणजे विपुल कदम आज त्यांच्या उपस्थित शुंगारतळी येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन मोठ्या थाटात केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की मी एक शिवसेनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे .मला कोणाचा नातेवाईक म्हणून बघू नका सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही शाखा उघडली आहे.
गुहागर विधानसभेमध्ये सर्वसामान्यांचा चेहरा कोण असेल हा निर्णय वरिष्ठ घेतील. असे विपुल कदम म्हणाले. सर्वत्र तुमच्या नावाची उमेदवार म्हणून चर्चा आहे असे विचारले असतात ते म्हणाले माझ्यावरती कार्यकर्त्यांचे प्रेम व कार्यकर्त्यांची इच्छा असू शकते. मी संघटना वाढीसाठी खूप काम करणार आहे. येथील संघटनेला बळ देण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे तसेच अजूनही काही शाखा आम्ही गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये उघडणार असून शाखेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील शिवसेनेच्या पहिल्या शाखेचे फित कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आत्माराम मोरे तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, संतोष आग्रे, अमरदीप परचुरे, रोहन भोसले, निलेश मोरे, महेश तावडे,आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.