दापोली – रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे सोशल मीडिया वरून दहा लाखांचे लोन देतो अशी जाहिरात करत सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला चौघांनी 1 लाख 72 हजार 554 रुपयांना गंडवले. याप्रकरणी पूर्ण नाव माहिती नसलेल्या चौघा जणांविरुद्ध दापोली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली येथील उदयनगर येथे घडली आहे. याप्रकरणी फिर्यादी सुधीर नरहरी होनवले या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने चौघां विरुद्ध ही तक्रार दिली आहे. त्यानुसार 29 जुलै रोजी सकाळी दहा वाजता सुमारास व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून त्यांना विकास बर्मन, चेतन धुरी, संजीव कुमार आणि अश्विन कुमार या अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून सुधीर होनवले यांना दहा लाख रुपये लोन देतो असं सांगितलं. यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी, जीएसटीसाठी पैसे भरावे लागतील असं सांगून होनवले यांच्याकडून व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून 1 लाख 72 हजार 554 रुपये हडप केले आणि त्यांची फसवणूक केली.
अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून सुधीर होनवले यांना दहा लाख रुपये लोन देतो असं सांगितलं. यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी, जीएसटीसाठी पैसे भरावे लागतील असं सांगून होनवले यांच्याकडून व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून 1 लाख 72 हजार 554 रुपये हडप केले आणि त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 318 (4), 3 (5), माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 प्रमाणे दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.