चिपळूण- चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथे एका तरुणाचा मृतदेह सापडला असून त्याची हत्या झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे सध्या पोलीस याचा तपास करत आहेत.
हमीद शेख असे या तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली असून चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ऐन गणेशोत्सवच्या धामधुमीत चिपळूण शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे.