चिपळूण- चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथे एका तरुणाचा मृतदेह सापडला असून त्याची हत्या झाल्याचा संशय आहे. मात्र चिपळूण पोलिसांच्या दमदार कामगिरीमुळे चिपळूण पोलिसांनी अवघ्या तीन तासात संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले त्यामुळे चिपळूण पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांच सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
चिपळूण ; तरुणाच्या हत्येने चिपळूण मध्ये खळबळ ..
शहरातील बहादूर शेख नाका परिसरात आज सकाळी हमीद शेख असे तरुणाचे नाव असलेल्या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यानंतर शहर परिसरात एकच खळबळ माजली उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने आणि चिपळूणचे नूतन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंडगे यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या परिसरातीलच दोन संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात त्यांना यश आले. सध्या पोलीस तपास सुरू असून या खुना मागे नक्की कोणते कारण आहे. या खुना मध्ये अजून कोण सहभागी आहेत. याचा तपास चिपळूण पोलीस करत आहेत. चिपळूण पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याने चिपळूण पोलिसांच सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.