गुहागर विधानसभा मतदारसंघ ; तुमच्या मनातील भावी आमदार..

0
654
बातम्या शेअर करा

गुहागर – राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी लागले यातच प्रगती टाइम्सने आपला भावी आमदार कोण.? असे ऑनलाईन मतदान मागवत मतदारांच्या मनातील भावी आमदार कोण..? हे जाणून घेण्याचं काम केलं. आणि त्यासाठी काही दिवस ऑनलाइन लिंक द्वारे मतदान करण्यात येऊन भावी आमदार कोण हे जाणून घेण्यात प्रगती टाइम्स यशस्वी झाले.

गुहागर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार भास्कर जाधव, भाजपचे माजी आमदार विनय नातू, एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार रामदास कदम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद गांधी ,माजी जिल्हा परिषद सदस्य सहदेव बेटकर भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार संतोष जैतापकर, तसेच बाबाजी जाधव यांच्यासह यापैकी कोणीही उमेदवार मान्य नाही असे पर्याय देऊन गेली पंधरा दिवस ऑनलाइन मतदान घेण्यात आल यामध्ये संभाव्य भावी आमदार म्हणून गुहागर मतदारसंघातून भाजपचे इच्छुक उमेदवार संतोष जैतापकर हे सगळ्यात जास्त मत घेऊन आघाडीवर असल्याचे दिसून आले. त्यांना एकूण झालेल्या मतदानापैकी 35.68% एवढी मत पडून आवडीचा उमेदवार म्हणून नागरिकांनी पसंती दिली आहे. तर त्याच्या खालोखाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद गांधी हे 22.% मतदान घेऊन दुसऱ्या क्रमांकाचे पसंतीचे उमेदवार ठरले आहेत. तर गुहागर-विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना 20.36% एवढी टक्के मत पडून तिसऱ्या क्रमांकाची पसंती दिली आहे. तर भाजपचे माजी आमदार विनय नातू यांना 15.33% एवढी मते पडली असून चौथ्या क्रमांकासाठी त्यांना पसंती दिली आहे. तर पाचव्या क्रमांकासाठी यापैकी कोणीही नाही याला 4.09% एवढी मते पडली आहेत. त्यानंतर विक्रांत जाधव, सहदेव बेटकर ,रामदास कदम, बाबाजी जाधव यांना पसंतीचे उमेदवार म्हणून मतदान झाल आहे.
प्रगती टाइम्स ने घेतलेल्या या ऑनलाइन मतदानामध्ये भाजपचे संतोष जैतापकर हे सर्वसामान्यांच्या मनातील संभाव्य आमदार म्हणून पसंतीस ठरले आहेत.

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ ; तुमच्या मनातील भावी आमदार..?

हे जे मतदान झाले ते ऑनलाईन झाल असल्याने ते नक्की कोणत्या एरियातून झालं हे मात्र सांगता येत नाही मात्र असं असलं तरी आजच्या या आधुनिक युगात किंवा डिजिटल युगात सर्वसामान्यांच्या मनातील भावी आमदार कोण हे जाणून घेण्याचा जो प्रगती टाइम्सने प्रयत्न केलाय तो सध्या तरी यशस्वी झाल्याच दिसून येत आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूक ही चुरशीची होणार असल्याच दिसून येत आहे.या मतदारसंघातून सध्या तरी भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार संतोष जैतापकर यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघात आम्ही जे पर्याय उमेदवार दिले होते त्यामध्ये भाजपचे माजी आमदार विनय नातू आणि भाजपचे इच्छुक उमेदवार संतोष जैतापकर असे दोन पर्याय आम्ही दिले होते या दोन्ही पर्यायांमध्ये मतदानाची विभागणी होऊन ही भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार संतोष जैतापकर हे सर्वसामान्यांच्या मनातील भावी आमदार म्हणून पसंतीस ठरले आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here