दापोली- खेड- मंडणगड विधानसभा मतदार संघ ; तुमच्या मनातील भावी आमदार…

0
370
बातम्या शेअर करा

खेड – राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी लागले यातच प्रगती टाइम्सने आपला भावी आमदार कोण.? असे ऑनलाईन मतदान मागवत मतदारांच्या मनातील भावी आमदार कोण..? हे जाणून घेण्याचं काम केलं. आणि त्यासाठी काही दिवस ऑनलाइन लिंक द्वारे मतदान करण्यात येऊन भावी आमदार कोण हे जाणून घेण्यात प्रगती टाइम्स यशस्वी झाले.

गुहागर विधानसभा मतदारसंघ ; तुमच्या मनातील भावी आमदार..

दापोली -खेड -मंडणगड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार योगेश कदम , भाजपचे केदार साठे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वैभव खेडेकर तसेच यापैकी कोणी उमेदवार मान्य नाही असे पर्याय देऊन गेली पंधरा दिवस ऑनलाइन मतदान घेण्यात आल यामध्ये संभाव्य भावी आमदार म्हणून दापोली -खेड -मंडणगड मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम हे सगळ्यात जास्त मत घेऊन आघाडीवर असल्याचे दिसून आले. त्यांना एकूण झालेल्या मतदानापैकी 47.84%एवढी मत पडून आवडीचा उमेदवार म्हणून नागरिकांनी पसंती दिली आहे. तर त्याच्या खालोखाल दापोली -खेड -मंडणगड -विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार योगेश कदम यांना 43.89% एवढी टक्के मत पडून दुसऱ्या क्रमांकाची पसंती दिली आहे. तर तिसऱ्या क्रमांकासाठी भाजपचे केदार साठे आणि चौथ्या क्रमांकासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वैभव खेडेकर व पाचव्या क्रमांकासाठी यापैकी कोणीही उमेदवार नाही याला पसंती दिली आहे. प्रगती टाइम्स ने घेतलेल्या या ऑनलाइन मतदानामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम हे सर्वसामान्यांच्या मनातील संभाव्य आमदार म्हणून पसंतीस ठरले आहेत.

हे जे मतदान झाले ते ऑनलाईन झाल असल्याने ते नक्की कोणत्या एरियातून झालं हे मात्र सांगता येत नाही मात्र असं असलं तरी आजच्या या आधुनिक युगात किंवा डिजिटल युगात सर्वसामान्यांच्या मनातील भावी आमदार कोण हे जाणून घेण्याचा जो प्रगती टाइम्सने प्रयत्न केलाय तो सध्या तरी यशस्वी झाल्याच दिसून येत आहे. त्यामुळे दापोली -खेड – मंडणगड विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूक ही चुरशीची होणार असल्याचा दिसून येत आहे.या मतदारसंघातून सध्या तरी माजी आमदार संजय कदम यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here