वाई -( प्रवीण गाडे )- सातारा जिल्ह्यातील वाई नगरपालिकेचे कामकाज आजपासून तीन दिवस बंद करण्यात आले आहे. उद्या सोमवारी घंटा गाडी येणार नाही.नगरपालिकेचा आरोग्य निरीक्षक कोरोना बाधीत झाल्याने कार्यालय व आस्थापना बंद राहणार आहेत. नगरपालिकेच्या सर्व सफाई कामगार प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची कोरोनाचाचणी करण्यात येणार आहे.उद्या सर्वांचे स्वाब घेण्यात येणार आहेत.मात्र असे असले तरी शहरातील पाणी पुरवठा मात्र सुरळीत सुरु राहणार आहे.यांची नागरिकांनी नोंद घ्यावीअसे आव्हान करण्यात आले आहे.