गुहागर ; या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना सडका आणि कुजका पोषण आहार देण्याची जबरदस्ती.?

0
353
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर – जे धान्य शाळेत उपलब्ध आहे ते खराब असले तरी तेच शिजवून पोषण आहारात द्या अशी जबरदस्ती मुख्याध्यापिकेने पोषण आहार शिजवून देणाऱ्या महिलेला केल्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील वेळंब येतील पूर्ण प्राथमिक मराठी शाळा क्रमांक एक मध्ये घडल्याने सध्या सर्वत्र संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सदर पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेने याबाबत गुहागर पंचायत समिती मधील शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार दिली आहे. आता शिक्षण विभाग यावर काय भूमिका घेते याकडेच सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

वेळंब पूर्ण प्राथमिक मराठी शाळा क्रमांक – 01मध्ये बहुतांशी कडधान्य व डाळी तसेच तांदूळ लागून खराब झाले झाले आणि ते मुलांना खाण्यास अयोग्य आहे अशा प्रकारची खंत शाळा सुरु झाल्यानंतर पोषण आहार शिजवून देणाऱ्या महिलेने केल्याने चक्क या महिलेलाच अपमान्सपद वागणूक देत कामावरून काढून टाकल्या ची घटना घडल्याने सध्या सर्वत्र संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नम्रता देवरुखकर यांनी पत्रात म्हटले आहे की २००२ पासून या शाळेमध्ये अन्न शिजवून देण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून मी या शाळेमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करीत असून पोषण आहार शिजवून देण्याचे काम करीत आहे. आजतागायत गेली २२ वर्षे हे काम मी नियमित कोणत्याही तक्रारी शिवाय शासनाच्या आदेशानुसार शासनाकडून येणाऱ्या अन्न धान्याच्या उपलब्धतेनुसार पोषण आहार शिजवून देण्याचे काम करीत आहे. या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून स्वाती चाफे या चालू शैक्षणिक वर्षापासून कार्यरत आहेत. या शैक्षणिक वर्षाकरिता एप्रिल २०२४ मधील शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत माझी पोषण आहार बनविण्यासाठी पुढील १० महिन्यांकरिता नेमणूक करण्यात आली होती.स्वाती चाफे यांना या आधीचे मुख्याध्यापक जाधव मे २०२४ या महिन्यात सेवानिवृत्त झाल्यानंतर मुख्याध्यापक पदाचा पदभार मिळणार होता. हे लक्षात घेऊन त्यांनी माझ्याकडून पोषण आहार किचनची चावी एक माझ्याकडे असायची ती माझ्याकडून ताब्यात घेतली. व प्रत्येक डब्याला लॉक लाऊन धान्य ठेवले.

मी दरवर्षी सर्व शिल्लक धान्य साफ करून ठेवत असायची. ते यांनी लॉक केल्यामुळे बहुतांशी कडधान्य व डाळी तसेच तांदूळ लागून खराब झाले. शाळा सुरु झाल्यानंतर पोषण आहार शिजवताना कडधान्य व डाळी तसेच तांदूळ नसल्याने पोषण आहार कसा बनवायचा हा प्रश्न मी त्यांना विचारला त्यावर मुख्याध्याक यांनी हेच धान्य साफ करून शिजवा असे सांगितले. त्यास मी नकार दिला. मुलांच्या स्वास्थ्याचा प्रश्न होता. त्यांच्या चुकीमुळे व खराब अन्न धान्य मी न शिजवल्यामुळे त्यांना सर्व पोषण आहार हा स्वःखचनि आणून द्यावा लागला. त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागल्यामुळे या गोष्टीचा मनात राग धरून मला रोज वेगवेगळ्या कारणाने त्रास देऊन मला ०२ ऑगस्ट २०२४ रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा बोलावून सदर सभेत मला अचानक कोणतीही पूर्व सूचना न देता उद्यापासून तुम्ही पोषण आहार बनवायला येऊ नका असे सांगितले. मी सदर बाबत मला लेखी कळवावे असे सांगितले त्यावर मी तुमची बांधील नाही असे त्या म्हणाल्या, तरी देखील त्यांनी मला लेखी न कळविल्यामुळे मी रोजच्या प्रमाणे नियमित पोषण आहार बनविण्यास हजर झाले होते, त्यावर माझे काम करायला मी घेतले होते त्यावेळी त्यांनी मला मी तुला ओळखत नाही. इथून चालती हो. तसेच शिवीगाळ देखील केली. अशा असभ्य वर्तनामुळे मला माझी मानसिक स्थिती ढासळली असून सदर शाळेतील मुख्याध्यापक या मला नाहक त्रास देत असून माझेवर अन्याय करीत आहेत. तरी मला न्याय मिळावा याबाबत त्यांनी लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीवर आता पंचायत समिती शिक्षण विभाग गुहागर नक्की काय भूमिका घेणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here