गुहागर – गुहागर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून एक बोगस डॉक्टर अर्धांगवायू आजारावर आयुर्वेदिक औषध विकत होता त्या औषधाचा कोणत्याच रुग्णावर काहीच परिणाम होत नसल्याने हे औषध बोगस असून यातून आपली फसवणूक होत असल्याची तक्रार अनेकांच्या लक्षात येताच त्या आयुर्वेदिक औषध विकणारा डॉक्टरच्या विरोधात गुहागर पोलिसात तक्रार झाली होती. 24 तासाच्या आत त्या संशयिताला गुहागर पोलिसांनी अटक केली व त्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे अनेकांची फसवणूक टळली आहे.
गुहागर तालुक्यात अर्धांगवायू आजारावर औषध विकणारा एक बोगस डॉक्टर गेले काही दिवस गाडी घेऊन गाव-वाडीवार फिरत होता. काही गावांमध्ये त्याने या औषधावर बरेच पैसे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अनेकांनी हे औषध खरेदी करुन स्वतःची फसवणुकही केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांना याची खबर मिळाली होती. संबंधित बोगस डॉक्टर व त्याचे वाहन फिरताना दिसताच गुहागर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी केले होते. गावागावातील पोलिसपाटील, जागृक नागरिक यांना सूचना देण्यात आल्या होत्या. अखेर पोलिसांच्या सूत्राकडूनच माहिती मिळताच संशयित चंद्रकांत पांडुरंग वायकर माळशिरस (जि. सोलापूर) याला गुहागर येथे गाडीसह ताब्यात घेण्यात आले. या घटनेची फिर्याद संदीप शांताराम हळ्ये याने पोलिसांना फिर्याद दिली. संशयित वायकर हा आपल्या घरी येऊन त्याने पॅरालिसीसचे बरेच रुग्ण बरे केल्याचे सांगून माझ्या वडिलांच्या पॅरालिसच्या आजार पूर्णपणे तात्काळ बरे करतो असे खोटी बतावणी करुन त्याच्यावरती विश्वास ठेवायला भाग पाडायचा. त्याच्याकडे औषध विक्रीचा कोणताही परवाना नसताना आपल्याकडील औषध हे अवास्तव किमतीत विकत घेण्यास फिर्यादीला भाग पाडून त्याच्यासह एकूण ३ लोकांची १९ हजार ३०० रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करुन आरोपीला गाडीसह गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करत आहेत. गुहागर तालुक्यात अशा प्रकारे जर कोणी बोगस औषध विकत असेल तर त्याच्या विरोधात तक्रार करावी असे आव्हान करण्यात येत आहे.