खेड; लोटे येथील पुष्कर केमिकल कंपनीत पुन्हा वायु गळती

0
104
बातम्या शेअर करा

चिपळूण – मुंबई गोवा महामार्गावर लोटे एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा व वायु गळती झाल्याने या परिसरात एकच घबराट पसरली आहे.

खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी मधील पुष्कर केमिकल कंपनीच्या प्लांट नंबर एक मध्ये ही वायू गळती झाल्याची घटना घडली आहे. या वायू गळतीमुळे या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.या एकाच महिन्यात पुष्कर केमिकल कंपनी मधील वायू गळतीची तिसरी घटना घडली आहे. असे असताना सुद्धा कंपनी प्रशासन मात्र अद्यापही डोळे झाकून का आहे. किंवा शासनाच्या अधिकारी या कंपनीवर का कारवाई करत नाहीत अशी चर्चा सध्या संपूर्ण लोटे परिसरात सुरू आहे.सध्या या कंपनीत अग्निशमन दलाच्या मदतीने वायुगळती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू. सतत होणाऱ्या दुर्घटनेमुळे लोटे एमआयडीसी परिसरातील नागरिकांमधून संतापाचे वातावरण.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here