चिपळूण – सातारा जिल्ह्यातील कोयनानगर व व चिपळूण तालुक्यातील पोफळी परिसरात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. २.८ रिक्टर स्केलचा हा भूकंप होता.
आज दुपारी ३ वाजून २६ मिनीटांनी हा भुकंपाचा धक्का जाणवला. त्याचा केंद्रबिंदू कोयना नगरजवळील हेळगाव गावच्या पश्चिमेला १० कि.मी आणि १५ कि.मी खोल होता. तर भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किमी. अंतरावर आहे. कोयनानगर, पोफळी शिरगांव परिसरात या भूकंपाचा धक्का जाणवला. याबाबत कोयना धरण प्रशासनाने धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे सांगितले. शिवाय कोठेही या भूकंपाने नुकसान झाल्याची नोंद नाही.