रत्नागिरी जिल्हा ; दोन विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी दावा करणार ! 

0
240
बातम्या शेअर करा

खेड  – रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील दोन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी तर्फे उमेदवार द्यावेत अशी आमची मागणी असून महायुतीतून हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षाला सोडावेत यासाठी लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी माध्यमां जवळ बोलताना दिली.

राज्याची विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आता हे जवळजवळ निश्चित झाले आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने संभाव्य उमेदवार मतदार आपापल्या मतदारसंघावर दावे करण्यास सुरुवात केलेली आहे त्याच पद्धतीने राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदार संघातून विद्यमान आमदार शेखर निकम यांना पुन्हा संधी मिळावी राजापूर व गुहागर या दोन मतदारसंघातील एक मतदार संघ राष्ट्रवादी पक्षाला मिळावा अशी आमची मागणी असून तशी  मागणी आम्ही रत्नागिरी जिल्हाच्या वतीने राष्ट्रवादी तर्फे पक्ष नेतृत्व म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे करणार असल्याचे  जाधव म्हणाले     
चिपळूण विधानसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून राष्ट्रवादी पक्षाकडे आहेत तिथे विद्यमान आमदार शेखर निकम अतिशय उत्तम प्रकारे काम करत असल्याने तेच पुन्हा उमेदवार असावेत तर राजापूर मतदारसंघात अजित यशवंतराव हे अतिशय उत्तम प्रकारे काम करत असल्याने त्यांना राजापूर मधून उमेदवारी मिळावी तसेच गुहागर मतदारसंघ जरी आम्हाला मिळाला तरी तेथे सुद्धा एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असून तेथे सुद्धा राष्ट्रवादीचे काम चांगले असल्याचे आम्हाला तेथून उमेदवारी मिळाली तरी चालेल रत्नागिरी जिल्ह्यातून दोन विधानसभा मतदारसंघ मिळावेत अशीच आमची मागणी पक्ष नेतृत्वाकडे असेल असे जाधव म्हणाले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here