चिपळूण — चिपळूण येथील वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. दुग्ध प्रकल्पाला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सदिच्छा भेट देत या प्रकल्पाचे भरभरून कौतुक केले. तर या प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज पुरस्कृत रत्नागिरी जिल्हा उद्योग विकास परिषद अंतर्गत उद्योजकता पुरस्कार २०२४ हा कार्यक्रम नुकताच चिपळूणमध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आले होते.यावेळी श्री. प्रभू यांनी चिपळूण-पिंपळीखुर्द येथील वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट देत या प्रकल्पाची कार्यप्रणाली व व्यवस्थापनाची माहिती घेतली. यावेळी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांचे विशेष कौतुक केले. तर या दोघांच्या अथक परिश्रम व उत्कृष्ठ व्यवस्थापनामुळे वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने उंच भरारी घेतली असल्याचे मत यावेळी त्यांनी मांडले. तर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंच्या प्रेरणादायी शब्दांनी आम्हाला नवीन उभारी मिळाली आहे आणि आम्ही आमच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनाद्वारे ग्राहकांची सेवा करण्यासाठी प्रेरित झाला आहोत, अशा शब्दात या प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी भावना व्यक्त केली आहे.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व सौ. उमा प्रभू यांचे वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी स्वागत केले. तर यावेळी चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू ,गद्रे मरीन कंपनीचे दीपक गद्रे , फेडरेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र सावंत, सचिव केशव भट, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, सेवानिवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव सहकार एस. बी.पाटील, प्रा. मीनल ओक , स्वामिनी यादव, महेंद्र खेतले, प्रशांत वाजे , अविनाश गूढेकर, लक्ष्मण खरात, प्रदीप मगदूम व सर्व अधिकारी उपस्थित होते.