गुहागर – राज्यभरात सध्या सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातलाय त्यातच आपल्या तालुक्यात पावसामुळे होणारे नुकसान याची तंतोतंत माहिती मिळावी आणि त्वरित त्यावर आदेश देऊन नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाव्यात यासाठी कार्यतत्पर असणारे गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी नैसर्गिक आपत्ती या ग्रुप द्वारे तालुक्यावर विशेष लक्ष ठेवून कामकाज सुरू ठेवल्याने सध्या त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
कोकणात पावसाळ्यात अनेक ठिकाणी खूप अडचणी येत असतात भरमसाठ पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाड पडून रस्ता बंद होणे. पुरामुळे रस्ता वाहून जाणे, एखाद्या ठिकाणी झाड पडून घराचं नुकसान होणे, एखाद्या ठिकाणी जमीन खचने, झाड पडून लाईट जाणे, लाईटचे खांब मोडणे किंवा एखाद्या गावात पूर येणे असे अनेक प्रकार हे पावसाळ्यात घडत असतात. गुहागर तालुका हा तसा डोंगराळ भागात विभागलेला गेलेला आहे. त्यामुळे ज्या गावात नैसर्गिक आपत्ती येते त्याची माहिती मिळणं कठीण होते. ती माहिती आजच्या या आधुनिक युगात तात्काळ मिळावी यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत तहसील कार्यालय गुहागर यांनी नैसर्गिक आपत्ती हा ग्रुप तयार केला. त्यामध्ये तालुक्यातील नामवंत पत्रकार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच तसेच स्वतः तहसीलदार व संपूर्ण तालुक्यातील शासकीय यंत्रणेचे अधिकारी यांना या ग्रुपमध्ये जोडण्यात आले एखाद्या गावामध्ये जर नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली तर तात्काळ त्या सरपंचांनी त्या ग्रुप मध्ये फोटोसह माहिती पोस्ट केली किंवा माहिती दिली तर ते सोडवण्याच्या आदेश तात्काळ तहसीलदार देत देतात. व त्याच दिवशी ती नैसर्गिक आपत्ती जी काही निर्माण झाली होती ती दूर करण्यात प्रशासनाला यश येते. आणि ती कशाप्रकारे दूर केली गेली याची माहिती आणि पोस्ट सुद्धा संबंधित खात्याच्या अधिकारी करत असतात. त्यामुळे या ग्रुपचा मोठ्या प्रमाणात फायदा नक्कीच गुहागर तालुक्याला होत आहे.अशा प्रकारे ग्रुप स्थापन करून यां पावसाळ्यात जनतेच्या उपयोगी पडणारे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या या ताबडतोब कामाचं अनेक ठिकाणी कौतुक होत आहे.