गुहागर- चिपळूण मार्गावरील उमरोली येथे आज शेतकरी कष्टकरी लाकूड व्यापारी संघटना रामपूर बीट आणि वनविभाग चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी जवळपास एक हजार नवीन झाडे लावण्यात आले.
अशी ही अजब ग्रामपंचायत ; माहिती अधिकारातील माहिती दिली चक्क 120 दिवसानंतर….
गेली काही वर्ष कोकणातील तापमान वाढत असून पाऊसही म्हणावा तसा पडत नाही तसेच यावर्षी उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवली जमिनीची धूप कमी करायची असेल तर मोठ्या प्रमाणात नवीन झाडं लावली पाहिजेत हाच ध्यास धरून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला आणि उमरोली आणि रामपूर परिसरात जवळपास एक हजार नवीन झाड आज लावण्यात आली.
या संपूर्ण वृक्ष लागवडीचा कार्यक्रम रामपूर बीट अध्यक्ष योगेश खांडेकर आणि पदाधिकारी व सदस्य यांनी हा कार्यक्रम उत्साहाने पार पाडला. तर या कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थिती परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री किर , वनपाल चिपळूण दौलत भोसले, वनरक्षक रामपूर राजाराम शिंदे चिपळूण तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष अमित सावंत व संजय थरवळ उमरोली सरपंच रुपाली मोहिते ,संतोष भडवळकर गौरव आग्रे, रुपाली अरमरे , विक्रम साळूंखे व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अशोक पोवळे, रुपेश खांडेकर, नागेश जाधव, विलास निकम, मोहन भोबस्कर, राजू खातू,प्रथमेश भोबस्कर, सोहम खातू, मारुती लाड, दशरथ जाधव, अरुण जाधव, शिवाजी चव्हाण, मंदार साळूंखे,केशव पालशेतकर, जनार्दन इंदूलकर, विलास निकम, स्वप्निल चव्हाण, वसंत वाघे, शरद पवार, गंगाराम महाडिक ,बाळा ओतरी आदि उपस्थित होते.