चिपळूण – त्याचं वय 36 मात्र मागील 17 वर्षात 35 वेळा रक्तदान करण्याचा त्याचा हा कारनामा अजब म्हणायचं ….होय हा तोच व्यक्ती आहे जो रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणतो आणि ज्या वेळेला कोणाला गरज लागते त्यावेळेला तो बिनधास्तपणे रक्तदान करतो असा मंदार वसंत देसाई…
सध्याच्या युगात रक्तदान करण्यासाठी अनेकांना प्रवृत्त करावे लागते मात्र याचवेळी रक्तदानाची एखाद्या वेळेला कोणाला गरज लागली तर तत्परतेने त्यांच्या सेवेसाठी हजर राहणारा चिपळूणच्या कापसाळ मोरेवाडीतील मंदार देसाई हा युवक गेली 17 वर्ष रक्तदान करतोय. मंदार सध्या प्रधानमंत्री क्रुषि सिंचन योजना आणि प्रधानमंत्री फळ विमा योजना चिपळूण मध्ये कार्यरत आहे. गेली 17 वर्ष रक्तदानाच्या या पवित्र क्षेत्रात मंदार आवडीने काम करतोय ओ निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगट असलेला या गटाकरता मंदार रक्तदान करतो.
मंदारचे वडील हे कृषी विभागात कार्यरत होते. ते नेहमी अनेकांना मदत करत असतात त्यांच्या या कार्यमुळे त्यांच्या मुलाने मदत करायचे ठरवले. आणि रक्तदानाला सुरुवात केली.
मंदारचे अनेक मित्र त्यामुळे त्याचे कौतुक करतात. समाजात वावरताना समाज्याच आपण काहीतरी देणं लागतो असं नेहमी मंदार म्हणत असतो त्यामुळे आपण एखाद्या वेळेला एखाद्याला रक्तदान करायचं म्हणलं की तत्परतेने पुढे येतो आणि रक्तदान करतो याही पुढे आपण रक्तदान करतच राहणार असं मंदार यांनी सांगितले.